अंत
पृथ्वीतलाच्या भवपटलावर विधात्याने मांडलेल्या खेळातील कटपुतळ्या म्हणजे माणूस… या पृथ्वीवर एके काळी जीव निर्माण झाला.. मग जीवाचे विविध प्रकार निर्माण झाले.. सुक्ष्मापासून सुरुवात होऊन अगदी अवाढव्य जीव सुद्धा ह्या पृथ्वीने निर्माण केले..आणि पुन्हा स्वतःच्या पोटात त्यांना जागा दिली… मग पाण्यात रहाणारे, जमिनीवर रहाणारे चार पायी, अवकाशात उंच भरारी घेणारे दोन पायी, सरपटणारे, वळवळणारे, कीटक, अनेक पायी इत्यादी इत्यादी…आणि प्रत्येक प्रकाराच्या अनेक जाती…variety मध्ये कुठेही कमी ठेवली नाही त्या विधात्याने… सोबतीला हिरवागार निसर्ग दिला..डोंगर दऱ्या, धबधबे, महासागर, समुद्र..प्रदेश जोडणाऱ्या आणि अवखळपणे वाहणाऱ्या नद्या दिल्या.. वरती आकाशात दिवस रात्रीची विभागणी करून दोन खंदे पहारेदार दिले ते म्हणजे चंद्र-सूर्य..आणि रात्रीच्या अंधाराला चंद्राला आणखी अगणित हात म्हणून तारका दिल्या… आणि या सगळ्यांची काळजी घेणारा आणि सर्वत्र विहार करणारा वायू दिला… पुढे या सगळ्याची सुंदर गुंफण होऊन ऋतुचक्र सुरू झालं…विविध ऋतू काही काळाने बदलत गेले..मग त्या त्या ऋतूमध्ये वाढणारी झाडं-फळं-फुलं आली.. अगदी...