नटखट लल्ला!
नटखट लल्ला जेव्हा चार महिने अवतरतो, नटखट लल्ला जेव्हा चार महिने अवतरतो, तेव्हा अनेक रूपाने चराचराला व्यापून टाकतो..! आला की चैतन्यात येतो.. ढगात लपून बसला की मात्र नैराश्य देतो.. नकोसा वाटला की हक्काने समोर येऊन उभा रहातो, आणि हवाहवासा वाटला की ढगांआडून हुलकावण्या देतो! किती वाट पहायला लावायची...? असं म्हणून आपण दरडवावं तर इतका मोहक बरसतो की धरणीमाताच त्याची बाजू घ्यायला सुगंधाने उभी रहाते! मग आपणही पुन्हा त्याच्या प्रेमात पडल्यावाचून राहूच शकत नाही! तो असाच आहे..तुम्ही त्यावर प्रेम करा अथवा द्वेष करा, तुम्ही त्याला टाळू शकत नाही..आणि आला की प्रेमात पडल्यावाचून राहू शकत नाही! शेवटी सगळ्यांची तहान भागवणारा तो एकच तर आहे! मग सांगा त्याला कृष्ण म्हंटलं तर चुकलं कुठे..?! ©कांचन लेले Photo Credits - Google