Posts

Showing posts from November, 2018

वाढदिवस!

Image
वाढदिवस, जन्मदिन, Birthday, सालगिराह इत्यादी इत्यादी अनेक शब्दांनी संबोधलेला एक खास दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच! तसंच प्रत्येकाच्या जन्माची काहीतरी कहाणी असतेच.. केव्हातरी आपली आई, आजी, आत्या, काकू, बहीण वगैरे कोणीतरी सांगतंच…साधारण असं "काय सांगू तुला, इतकाss पाऊस पडत होता त्यादिवशी आणि नेमकं घरात कोणी नाही" किंवा "दिलेली तारीख होती महिन्यानंतरची आणि तुला कोण घाई झाली होती, आठव्याच महिन्यात अवतरलास" ..किंवा (विशेषतः आमच्या किंवा आमच्या आधीच्या "दुसऱ्या" मुलींच्या बाबतीत) मुलगी झाली म्हणून बघायला सुद्धा आल्या नव्हत्या सासूबाई"  किंवा "तुझ्या बाबांना कळवलं तेव्हा ते एका हॉटेलात जेवत होते, त्यांनी चक्क तिथे बसलेल्या सगळ्यांना गुलाबजाम द्यायला सांगितले!!" एक ना दोन! अशी आपल्याच जन्माची कथा रंगवून रंगवून नातेवाईक सांगत असतात आणि आपण ऐकत असतो! तेवढंच काय ते आपल्याला समाधान! कधी कधी बारीक विचार केला की कळतं आपल्या जन्माने आपण कित्तीsss लोकांना आनंद दिलेला असतो. आई-बाबांच्या डोळ्यात तो आयुष्यभर दिसतोच! आपण म्हणजे ज्यांची दुधावरची साय अस...