खम्माघणी राजस्थान - भाग ५!
भाग ५ आम्ही पहाटे जोधपूरला पोहोचलो, स्टेशहून झोस्टेलला जायला ओला केली होती, ती सुद्धा वेळेत आली आणि आम्ही मार्गस्थ झालो.. भल्या पहाटे कुठलंही शहर सारखंच दिसत असावं…untouched beauty म्हणतात तसं! बऱ्याच गल्या गल्या असणाऱ्या भागात आम्ही पोहोचलो आणि एका जागी द्रायव्हरने गाडी थांबवली, आणि पुढे गाडी जाणार नाही सांगितलं…झालं, मग आम्ही आणि बॅग्स असं पायी झोस्टेलकडे..तसं अगदीच जवळ होतं ते, एका गल्लीत शिरुन पुन्हा लगेच डावीकडे गेलं की समोरच…पण तेवढ्या वेळात आमच्या ट्रॉली बॅग्सचा जो काही आवाज होत होता त्याने सगळी वस्ती जागी होते की काय असं वाटलं! तर एकदाचे आम्ही पोहोचलो, झोस्टेल या चेन ची खासीयतच आहे ते म्हणजे त्यांचं इंटिरियर, ब्राईट vibrant कलर वापरून, आणि authentic वस्तूंनी सजवलेली जागा कोणाला आवडणार नाही! तर आत गेलो, पण मानून कुणी दिसेना, साधारण सहा वाजले होते आणि त्यात दिवस थंडीचे..खरंतर अशात कुणाची झोप मोडायचं पातकच लागत असणार, व काय करणार..पर्याय नव्हता मग आवाज देऊन, टेबल बडवून, त्यानेही काही होईना म्हणून फोन करुन थोड्या वेळाने कुठून तरी एका माणसाचा आवाज आला, आणि मग तो साक...