असं कधी होतं का तुमचं..?!
असं कधी होतं का तुमचं…? आनंदाचं उधाण येतं! चेहऱ्यावर सतत स्मित विलसतं…येणाऱ्या जाणाऱ्याला प्रसन्न करतं..कोणी अगदी धक्का दिला तरी मन म्हणतं "छोड दिया आज! तू भी क्या याद रखेगा..?"… सरळ वाटेने न जाता वाकडी वाट करुन काहीतरी आवडीचं करतं..उगाचच एखाद्या जवळच्या व्यक्तीला फोन करतं… मधेच स्वतःसाठी एखादं चाफ्याचं फुल घेतं..बसने न जाता सरळ रिक्षात बसुन मोकळं होतं..उगाच स्वतःचेच लाड करतं! . . असं होतं का कधी तुमचं..? . . स्वच्छ आभाळात क्षणात मळभ दाटतं..ऐन थंडीत पावसाची सर झेलतं.. नेहेमीच्या वेगात काम करत असताना एखादी कटू आठवण मनाची तार अशी छेडून जाते, की ती तुटून डोळ्यात टचकन पाणीच येतं .. मग क्षणात आपण कुठे आहोत हे लक्षात येतं.. काहीतरी करुन मग मन डोळ्यातलं पाणी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतं.. हळूच कुणी बघितलं नसेल ना म्हणून आजूबाजूला डोकावून बघतं…आणि पुन्हा कामात व्यस्त होतं, पण ते लपवलेले अश्रू उशीवर डोकं टेकताच रिते करतं... . . असं होतं का कधी तुमचं..? . . प्रचंड आनंदी वातावरणात सगळीकडे उत्साह असताना, एखादं मंगलकार्य असताना, आपलं आनंदी मन उगाचच एका शंकेच्या प...