Posts

Showing posts from March, 2022

पावनखिंड - एक अनुभव!

Image
थिएटर पुन्हा सुरु झाल्यापासून दर्जेदार सिनेमांची खैरात प्रेक्षकांपुढे मांडली जात आहे याचा प्रचंड आनंद आहे. पावनखिंड आणि द काश्मीर फाईल्स, हे दोन्ही सिनेमे दर्जेदार असूनही कितपत बघवतील ही भीती मनात होती. माझ्या सुदैवाने लहानपणापासून चांगलं साहित्य आई वडिलांनी हातात दिल्याने शिवचरित्र अनेक वेळा डोळ्याखालून गेलेलं होतं. अनेक रात्री जागवल्या होत्या. अनेक वेळा उशी भिजली होती. आता हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघायचं म्हणजे काय होईल? हा विचार करुन एवढे दिवस गेले नव्हते. पण मग वाटलं आपण जर आज गेलो नाही, तर उद्या आपण एक रसिक प्रेक्षक म्हणून व्यर्थ ठरु. आपले काही शिवभक्त कलाकार आपला वेळ-पैसा आणि घाम गाळून महाराजांची व त्यांच्या अनेक शूर साथीदारांची कीर्ती जगासमोर मांडतायत आणि आपण घरात बसून रहाणं हे चूक नाही,  हा गुन्हा आहे. म्हणून फोन उघडून तिकीट काढावं म्हंटलं, तर एक शो होता ज्याची वेळ जमण्यासारखी होती आणि अजून house full नव्हता. बाकी बरेच शो house full होते याचा मनोमन आनंदच वाटला. मग त्या शो चं तिकीट काढावं म्हणून booking process केलं तर पहिल्या रांगेतली पहिली एकच सीट बाकी होती. काह...