Happy 60th Birthday Wonder Woman!
आपल्या आयुष्यात सगळ्यात पहिली wonder woman येते ती म्हणजे आपली आई! आणि आज माझ्या wonder womanचा ६०वा वाढदिवस! खरं सांगू तर असं वाटतंच नाहीये..कारण आजही तिचा कामाचा उत्साह, चेहऱ्यावरचा टवटवितपणा आणि आम्हाला लाजवेल अशी जिद्द हे सगळं अवाक करणारं आहे! बेताच्या परिस्थितीत बर्व्यांच्या घरात झालेला जन्म..नंतर नारायणगावात ती वाढली जिथे आजोबा शेती सांभाळायचे. मूळ गावापासून लांब त्यामुळे सकाळी येणाऱ्या दुधाच्या गाडीबरोबर शाळेत जायचं..ती चुकली तर एवढ्या लांब चालत जायचं असा खडतर प्रवास! खरंतर व्हायचं होतं डॉक्टर, पण योग्य मार्गदर्शन नाही व त्यामुळे लागतील इतके मार्क मिळाले नाहीत आणि त्यातही ओपन कॅटेगरी आणि मध्यमवर्ग म्हणजे तर जवळजवळ अशक्यच.. पण म्हणून जिद्द न हरता तिने नर्सिंग हा विषय घेऊन पुण्यात शिक्षण घेतलं..पुढे नर्स म्हणून अतिशय तन्मयतेने, सेवाभावी वृत्तीने अनेक वर्षे तिने काम केलं..पुण्यातून मुंबईत आली, नातेवाईकांकडे राहून काम केलं.. दरम्यान लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा स्वतःच्या पायावर उभी असून, शासकीय नोकरी असूनही केवळ शिफ्ट ड्युटी असते आणि नर्स आहे म्हणून अनेकांनी न...