Butterfly.. एक तरल कथा!
Fly like a butterfly, Sting like a bee!! Butterfly ही मेघाच्या आयुष्याची कथा! खरंतर अशा अनेक मेघा आपल्या आसपास असतात..कधीकधी आपणच मेघा असतो.. कधी तिऱ्हाईत म्हणून तिला बघत असतो! पण तीच कथा 80 mm च्या स्क्रिन वर दिसू शकेल हे कळायला नजरच लागते! आणि वेलणकर भगिनींना ते करेक्ट जमलेलं आहे! एक साधी सोपी कथा घेऊन त्या भोवती मोजक्या पात्रांची गुंफण करुन सरळ सोप्या पद्धतीने केलेली कथेची मांडणी मनाला भिडून जाते.. एक दोन ठिकाणी गोष्टी खूप predictable, किंचित अति रंजित आणि सिरीयल type वाटतात. एक दोन scenes मधे अरे असं कसं झालं असंही वाटून जातं, पण कदाचित ती माध्यमाची गरज असू शकते. संगीत सुद्धा छान हलकं फुलकं झालं आहे..विशेषतः शेवटच्या sequence मधली कविता मनात रुंजी घालते.. पटकथा आणि संवाद सुंदर जमले आहेत. उगाच गृहिणीचं दुःख मांडणारं स्वगत वगैरे कुठेही येत नाही..या उलट लहान लहान पण अतिशय आशयघन संवाद उत्तम गुंफले आहेत जे तुम्हाला विचार करायला लावतात. काही ठिकाणी खूप shake होणारा कॅमेरा मात्र त्रासदायक वाटतो..त्यामागचं कारण लक्षात आलं नाही..ट्रेलर मधे दिसलेल्या बऱ्याच गोष्टी चित्रपटात ...