Posts

Showing posts from October, 2023

प्रवासाचा प्रवास...

Image
प्रवास... जन्माला यायच्या आधीपासून सुरु असतो तो अनेक फेऱ्यांचा प्रवास.. आईच्या पोटात आल्यापासून सुरू होतो तो जीवनाचा प्रवास... आणि जन्म झाल्यावर सुरु होतो तो प्रवासाचा प्रवास! माझा प्रवास सुरु झाला तो बहुतेक कोकणापासून..लहानपणी  कोकणात जाणं म्हणजे एक पर्वणीच असायची! तेव्हा किती सहज उपलब्ध होतं सगळं... नजर जाईल तिथवरची हिरवळ...त्यातल्याही विविध छटा.. शुद्ध हवा..लाल माती...कोसळणारा पाऊस.. तो मातीचा गंध.. आहा! तेव्हा हे सगळं लक्षात यायचं वय नव्हतं..आता मात्र त्याचं महत्व चांगलं कळतं, पण द्यायला तेवढा वेळ कुठून आणता..?! मुंबईसारख्या शहरात रहाणाऱ्या माणसासाठी कुठलाही निसर्गाजवळ जाणारा प्रवास म्हणजे अप्रुपच! यातही जे "भटके" म्हणून जन्माला येतात, त्यांना लागलेलं व्यसन म्हणजे प्रवास! मी अनेक प्रांतात थोडे थोडे दिवस जाऊन आले आहे.. सुरवात झाली ती उत्तराखंड पासून! हरिद्वार, हृषीकेश, बद्री-केदार... आणि तिथला सगळा परिसर म्हणजे स्वर्गच जणू! त्या प्रवासाने मला जागं केलं..  आपल्या देशाची नवी ओळख करुन दिली.. तिथल्या निसर्गाने मोहिनी घातली.. आणि या भारत भूमीच्या सौंदर्य...