उधळण...!
कधी कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं जर वेड असेल तर त्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. किंवा ते वेड तुम्हाला खेचून घेतं असं म्हंटलं तरी वावगं ठरू नये..शेवटी बाबासाहेबांनी शिवकल्याण राजा मध्ये म्हणूनच ठेवलं आहे, 'वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही!'..आपल्याला काही इतिहास घडवायचा नाही, पण असो! तर काल संध्याकाळी काम आटपून असाच बसलो होतो. सहज बाहेर लक्ष गेले. पावसाने जरा विश्रांती घेतली होती. मस्त वारं सुटला होते. थोडे थोडे निळे आकाश दिसत होते. हे वातावरण म्हणजे 'between the lines' म्हणतात तसं म्हणायला हरकत नाही..कोसळणाऱ्या पावसाचं सौंदर्य सगळ्यांनाच दिसतं..पण ह्या वातावरणातही एक वेगळंच सौंदर्य दडलेलं आहे..आणि त्याच सौंदर्याच्या ओढीने पटकन गाडी काढली, बायको (कॅमेरा)ला बरोबर घेतले आणि पटकन ARAI टेकडी गाठली. पावसामुळे गर्दी कमी होती. असलं भारी वाटलं...! आणि जरा दृष्टी फिरवली तर निसर्गाचे अनोखे रुपडे दिसत होते. मधे निळे, मधेच काळे, त्याच्या बरोबर मधेच सांजवेळेचा केशरट पिवळा, खाली धरतीच हिरवा अशी सुरेख रंगात माखलेली सृष्टी दिसत होती! मागच्या बाजूला गेलो. बोटावर मोजण्या एव...