SlowFast!
नेहेमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून निघाले.. रम्य संध्याकाळ होती..स्टेशनला आले तर नुकतीच ट्रेन फलाटावर येत होती..वेग मंदावला होता ट्रेनचा, आणि वाढला होता माणसांचा.. खोपोली फास्ट…लांब पल्ल्याची गाडी..अनेक लोकांची नेहेमीची ठरलेली, काही लोकांची पहिलीच वेळ, काहींची हुकलेल्या ट्रेनची रिकामी जागा भरण्यासाठीची.. गाडी स्थिरावायच्या आतच अनेक लोक आत शिरून मोकळे झाले होते…त्यात मी ही होतेच..निघेपर्यंत ट्रेन नेहेमीप्रमाणे भरलेली होती..माझ्या समोरच्या खिडकीत एक लहान मुलगा त्याच्या आईबरोबर बसला होता..बसल्या बसल्या त्याने थोडं इकडचं तिकडचं निरीक्षण केलं आणि मग कंटाळून कुरबुर करू लागला.. आई त्याला समजावत होती इतक्यात ट्रेन सुरू झाली..त्या मुलाने डोळे टवकारले! आणि जसजशी ट्रेन वेग घेत होती, तो मुलगा आनंदाने पण शांतपणे बाहेर बघत होता..डोळ्यात एक प्रकारचं कुतूहल होतं..ट्रेन पुढेपुढे जात होती..आणि काही वेळात आमच्या ट्रेनने एका स्लो ट्रेनला ओव्हरटेक केलं..मुलगा आनंदाने ओरडला! 'आम्ही पुढे गेलो...टुकटुक!' असं त्या ट्रेनच्या दिशेने बघत वेडावू लागला! मला गंमत वाटली..इतका वेळ शांतपणे बाहेर बघण...