ऐसी अक्षरे रसिके मेळवीन!
काल, २२ जानेवारी २०२० रोजी भेट दिली ती ज्येष्ठ सुलेखनकार श्री.अच्युत पालव यांच्या कला प्रदर्शनाला! (पत्ता - जहांगीर आर्ट गॅलरी, काला घोडा, फोर्ट, मुंबई. तारीख-वेळ - २७ जानेवारी २०२० पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत) दार उघडल्यावर समोरच छोटीशी प्रस्तावना, त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा अगदीच ओझरता घेतलेला आढावा! आणि तो दरवाजा उघडल्यावर सुरवात होते एका आगळ्या नयनरम्य कला सफरीचा! आत गेल्यावर दोहो बाजुंनी भिंतीवर अनेक कलाकृती लावलेल्या आहेत..डावीकडे पहिलाच लावलाय तो एक फळा, हो, शाळेतला फळा ज्यावर रोज कोणीतरी सुविचार लिहीत असे! जिथून त्यांची सुरवात झाली, तेच हे अच्युत पालव! ज्यांनी आपली मातृभाषा मोठी करायची ठरवली, त्यातलं सौंदर्य जाणून त्याला आणखी अलंकृत केलं तेच हे अच्युत पालव! दोन्ही भिंतींवर लावलेली अप्रतिम, सुंदर, काही गूढ, काही अगम्य, काही abstract, काही पुराण काळातील भाषा दर्शवणारी तर काही खूप खोल सामाजिक संदेश देणारी पण सगळीच सौंदर्यपूर्ण "अक्षर"चित्र आहेत! पण त्याच बरोबर अधे मधे एका मोड्यावर एक ट्रे ठेवला आहे, त्यात अनेक रफ पेपर वाटावे असे पेपर, त्यात अने...