लता..
लता दीदी गेल्या.. आज एका विलक्षण सांगीतिक युगाचा अंत झाला.. असं कितीही वाटलं की आता ९२ वर्षं म्हणजे काही कमी नाही, खूप उत्तम जगल्या वगैरे वगैरे तरी ती एक पोकळी जाणवतेच, ती कधीच भरुन निघणार नाही. आयुष्यात एकदा त्यांना भेटायचा योग आला, तो सुद्धा इतका विलक्षण! शिवसेनेने आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात दीदी गाणार आणि त्यांच्या बरोबर महानगर पालिकेच्या शाळांतिल मुलं गाणार असा कार्यक्रम होता..वर्ष असावं २०१०.. तेव्हा आमचे सर महानगरपालिकेतील शाळेत संगीत शिक्षक असल्याने आम्ही तो चान्स सोडण्याचा प्रश्नच नव्हता.. कार्यक्रमाच्या दिवशी कडक बंदोबस्तात कसे बसे आत गेलो.. स्टेजवर मांदियाळीच होती..साक्षात वंदनीय बाळासाहेब ठाकरे उभे होते! त्याबरोबर अनेक ज्येष्ठ नेते, कलाकार.. आणि मग स्टेजच्या एका बाजूला लिफ्ट सारखि काहीतरी योजना केलेली होती त्यातुन दिदींची एन्ट्री झाली! सगळं वातावरणच भारावून टाकणारं होतं. खुल्या आसमंतात त्यांचा घुमणारा स्वर त्या बालवयात सुद्धा अंगावर रोमांच उभे करुन गेला..पण तेव्हा हे का झालं ते कळलंही नसावं! कार्यक्रम झाला तसे सगळे स्टेजच्या मागे काही टेम्पररी रुम बांधल...