अमावस्येचा चंद्र!
अमावस्येचा चंद्र! अमावस्येचा चंद्र! काय…? हो…अमावस्येचा चंद्र! शीर्षक वाचून हसू येईल कदाचित..पण इंग्रजीत म्हणतात तसं 'between the lines' या तत्वावर हे शीर्षक अगदीच योग्य आहे! चंद्र… सानापासून थोरांपर्यंत सगळ्यांना अप्रूप असणारी अगम्य निर्मिती! शीतलतेचं प्रतीक! सौंदर्याचा बावनकशी नमुना! खरंतर लोभासवणा दिसतो तो पौर्णिमेचा चंद्र! किंवा प्रतिपदेची बाssरीक रेखीव कोर! पण अमावस्येचा चंद्र जितका हवासा वाटतो तितका कदाचित पौर्णिमेचाही नाही वाटत.. गमतीदार आहे नाही..? तीस दिवसाच्या कालखंडात २९ दिवस चंद्र आकाशात असतो.. किती दिवस आपलं लक्ष जातं..? पौर्णिमेला मात्र तो लक्ष वेधल्याशिवाय रहात नाही..आणि अमावस्येलाही! अगदी शहराच्या भरमसाठ लाइट मध्ये सुद्धा तो जर्द काळोख जाणवला की मात्र मनात येऊन जातं 'आज अमावस्या असावी..' कारण ३१ डिसेंम्बरला नवीन वर्ष साजरा करण्याच्या जमान्यात तिथी वगैरे कुठे बघत बसतायत लोक! पण चंद्र काही वाईट वाटून घेत नाही…तो असतो सतत साक्षीला.. शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत त्याची तब्बेत सुधारत जाते..तो बाळसं धरत वाढणारा चंद्र जर रोज बघितला तर त...