ऋषिकेश - मसुरी - भाग ६!
झोपेतून उठलो तर काय?! बातम्या, whatsapp मेसेज आणि शेवटी घरुन आलेला फोन! झालं असं होतं की दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या सगळ्या प्रवाशांना कोव्हिड टेस्ट बंधनकारक केली होती. आधी आम्हाला वाटत होतं फ्लाईट ने जाणाऱ्यांसाठीच आहे ते, पण नाही..ट्रेन, फ्लाईट किंवा अगदी by road जाणाऱ्यांसाठी सुद्धा तोच नियम केलेला. त्याशिवाय आमच्या रुम मधली एक मुलगी म्हणाली ती दुसऱ्या दिवशी देहरादुनला जाऊन टेस्ट करुन घेणार आहे म्हणून.. आता ती टेस्ट करण्यापेक्षा देहरादुनला जाऊन यायचा खर्च तिप्पट होणार होता. पुढचा एकच दिवस मसुरीत होतो, तिसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडून, फिरून मग रात्रीची ट्रेन दिल्लीला जायला होती. मग तिथे माझा मित्र भेटणार होतो जो जवळजवळ दोन वर्षे भेटला नव्हता!! मग दिवस काढून रात्री तिथून पुढे दिल्ली-मुंबई ट्रेन.. आता सगळाच गोंधळ झालेला.. डोक्यात विचारांचा गोंधळ..प्रवासाचा थकवा..त्यात उपास.. आणि मसुरीच्या एका डोंगराळ कोपऱ्यात असल्याने कुठलीही साधनं नाहीत.. अशावेळी खरं एकतर प्रचंड चिडचिड होऊ शकते, किंवा एकदम depressed वाटू शकतं.. पण आम्ही pros and cons बघायचं ठरवलं! जर टेस्ट करायची झाली तर देहरादूनशिवाय प