Posts

Showing posts from 2018

वाढदिवस!

Image
वाढदिवस, जन्मदिन, Birthday, सालगिराह इत्यादी इत्यादी अनेक शब्दांनी संबोधलेला एक खास दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच! तसंच प्रत्येकाच्या जन्माची काहीतरी कहाणी असतेच.. केव्हातरी आपली आई, आजी, आत्या, काकू, बहीण वगैरे कोणीतरी सांगतंच…साधारण असं "काय सांगू तुला, इतकाss पाऊस पडत होता त्यादिवशी आणि नेमकं घरात कोणी नाही" किंवा "दिलेली तारीख होती महिन्यानंतरची आणि तुला कोण घाई झाली होती, आठव्याच महिन्यात अवतरलास" ..किंवा (विशेषतः आमच्या किंवा आमच्या आधीच्या "दुसऱ्या" मुलींच्या बाबतीत) मुलगी झाली म्हणून बघायला सुद्धा आल्या नव्हत्या सासूबाई"  किंवा "तुझ्या बाबांना कळवलं तेव्हा ते एका हॉटेलात जेवत होते, त्यांनी चक्क तिथे बसलेल्या सगळ्यांना गुलाबजाम द्यायला सांगितले!!" एक ना दोन! अशी आपल्याच जन्माची कथा रंगवून रंगवून नातेवाईक सांगत असतात आणि आपण ऐकत असतो! तेवढंच काय ते आपल्याला समाधान! कधी कधी बारीक विचार केला की कळतं आपल्या जन्माने आपण कित्तीsss लोकांना आनंद दिलेला असतो. आई-बाबांच्या डोळ्यात तो आयुष्यभर दिसतोच! आपण म्हणजे ज्यांची दुधावरची साय अस...

नटखट लल्ला!

Image
नटखट लल्ला जेव्हा चार महिने अवतरतो, नटखट लल्ला जेव्हा चार महिने अवतरतो, तेव्हा अनेक रूपाने चराचराला व्यापून टाकतो..! आला की चैतन्यात येतो.. ढगात लपून बसला की मात्र नैराश्य देतो.. नकोसा वाटला की हक्काने समोर येऊन उभा रहातो, आणि हवाहवासा वाटला की ढगांआडून हुलकावण्या देतो! किती वाट पहायला लावायची...? असं म्हणून आपण दरडवावं तर इतका मोहक बरसतो की धरणीमाताच त्याची बाजू घ्यायला सुगंधाने उभी रहाते! मग आपणही पुन्हा त्याच्या प्रेमात पडल्यावाचून राहूच शकत नाही! तो असाच आहे..तुम्ही त्यावर प्रेम करा अथवा द्वेष करा, तुम्ही त्याला टाळू शकत नाही..आणि आला की प्रेमात पडल्यावाचून राहू शकत नाही! शेवटी सगळ्यांची तहान भागवणारा तो एकच तर आहे! मग सांगा त्याला कृष्ण म्हंटलं तर चुकलं कुठे..?! ©कांचन लेले Photo Credits - Google

अमावस्येचा चंद्र!

Image
अमावस्येचा चंद्र! अमावस्येचा चंद्र! काय…? हो…अमावस्येचा चंद्र! शीर्षक वाचून हसू येईल कदाचित..पण इंग्रजीत म्हणतात तसं 'between the lines' या तत्वावर हे शीर्षक अगदीच योग्य आहे! चंद्र… सानापासून थोरांपर्यंत सगळ्यांना अप्रूप असणारी अगम्य निर्मिती! शीतलतेचं प्रतीक! सौंदर्याचा बावनकशी नमुना! खरंतर लोभासवणा दिसतो तो पौर्णिमेचा चंद्र! किंवा प्रतिपदेची बाssरीक रेखीव कोर! पण अमावस्येचा चंद्र जितका हवासा वाटतो तितका कदाचित पौर्णिमेचाही नाही वाटत.. गमतीदार आहे नाही..? तीस दिवसाच्या कालखंडात २९ दिवस चंद्र आकाशात असतो.. किती दिवस आपलं लक्ष जातं..? पौर्णिमेला मात्र तो लक्ष वेधल्याशिवाय रहात नाही..आणि अमावस्येलाही! अगदी शहराच्या भरमसाठ लाइट मध्ये सुद्धा तो जर्द काळोख जाणवला की मात्र मनात येऊन जातं 'आज अमावस्या असावी..' कारण ३१ डिसेंम्बरला नवीन वर्ष साजरा करण्याच्या जमान्यात तिथी वगैरे कुठे बघत बसतायत लोक! पण चंद्र काही वाईट वाटून घेत नाही…तो असतो सतत साक्षीला.. शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत त्याची तब्बेत सुधारत जाते..तो बाळसं धरत वाढणारा चंद्र जर रोज बघितला तर त...

मातृत्व!

Image
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी.. असं पूर्वापार मानलं गेलं आहे… आई! या एका शब्दभोवती खूप मोठ्ठं वलय आहे… आणि म्हंटलं तर तो फक्त दोन अक्षरी शब्द आहे! म्हणजे कुठूनही घरात आलं आणि आईने दार नाही उघडलं की पहिला प्रश्न असतो "आई कुठंय?" तिच्याकडे काही काम असतं असं नाही.. पण तरी तिचं असणं गरजेचं असतं.. बरं वाटत नसलं की कुणी म्हणतं डॉक्टरांकडे जाऊ..तेव्हा उत्तर एकच असतं..आधी आईला बोलवा.. कुठलीही वस्तू सापडत नसेल की वरवर शोधूनच पहिला फोन जातो आईला..मग अगदी लगेच सापडते…बरेच दिवस बाहेरगावी असलं की फोन करो ना करो, पण परतायच्या एक दिवस आधी जेवायला काय हवंय ते सांगायला फोन नक्की होतोच! एक ना दोन..म्हणून म्हंटलं..मोठ्ठं वलय आहे! शाळेत असताना आम्हाला एक कविता होती.. आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर, निळ्या आकाशाएवढा तिच्या मायेचा पदर! डोक्याने खूपच लहान होतो तेव्हा..पण आईवर काहीतरी म्हणजे भारी ना..असं वाटायचं! पण 'आकाशाएवढा पदर' असं वाचल्यावर घरी जाऊन दोन्ही हात पसरून तो मोजला नक्कीच असेल कोणीतरी! कारण त्या वयात 'मायेचा' या शब्दाचा अर्थ तितकासा कळत नसतो...

आंडू गुंडू थंडा पाणी!

Image
काल एका बाल मैत्रिणीने एक 'meme' पाठवलं.. त्यात एक जण दुसऱ्याला म्हणत असतो - "ए तो बघ south indian!" आणि दुसरा लगेच ओरडतो - "ए आंडू गुंडू थंडा पाणी!" एवढं वाचल्याबरोबर माझ्या मनाचं टाइम मशीन अचानक सुरू झालं आणि मला एक दशक किंवा आणखी थोडं जास्ती मागे घेऊन गेलं! आत्ता मूर्खपणा वाटत असेल पण खरंच आम्ही असं करायचो तेव्हा..दाक्षिणात्य लोकांना आंडू गुंडू म्हणायचो, सरदारजी दिसला की चंगोटी (पहिली दोन बोटं टोकाला टोक जुळवून धरायची, म्हणजे त्यातून एक भोक होतं आणि मग कोणीतरी त्यात बोट घालून ते फोडायचं!),  केस कापले की 'ताजी' मारणं, नवीन वस्तू घेतली आणि कळलं की जोरात धपाटा मारणं, birthday bombs मारणं! इत्यादी इत्यादी! हे झाले जनरल खेळ..मग शाळेतले खेळ वेगळे! ऑपस्-बँट्स, जॉली, पेन फाइट, स्केल फाइट..हे न लिहिता खेळायचे खेळ..आणि लिहून खेळायचे तर कहरच! त्यात दोन प्रकारचे लोक! एक म्हणजे कुठल्याही वहीच्या मागे हे खेळ खेळणारे, तर दुसरे बाकी सगळ्या विषयाच्या वह्या रिकाम्या असल्या तरी त्याला हात न लावता एका वर्षात साधारण ५-६ रफ बुक भरणारे! (म्हणजे माझ्...

अंत

Image
पृथ्वीतलाच्या भवपटलावर विधात्याने मांडलेल्या खेळातील कटपुतळ्या म्हणजे माणूस… या पृथ्वीवर एके काळी जीव निर्माण झाला.. मग जीवाचे विविध प्रकार निर्माण झाले.. सुक्ष्मापासून सुरुवात होऊन अगदी अवाढव्य जीव सुद्धा ह्या पृथ्वीने निर्माण केले..आणि पुन्हा स्वतःच्या पोटात त्यांना जागा दिली… मग पाण्यात रहाणारे, जमिनीवर रहाणारे चार पायी,  अवकाशात उंच भरारी घेणारे दोन पायी, सरपटणारे, वळवळणारे, कीटक, अनेक पायी इत्यादी इत्यादी…आणि प्रत्येक प्रकाराच्या अनेक जाती…variety मध्ये कुठेही कमी ठेवली नाही त्या विधात्याने… सोबतीला हिरवागार निसर्ग दिला..डोंगर दऱ्या, धबधबे, महासागर, समुद्र..प्रदेश जोडणाऱ्या आणि अवखळपणे वाहणाऱ्या नद्या दिल्या.. वरती आकाशात दिवस रात्रीची विभागणी करून दोन खंदे पहारेदार दिले ते म्हणजे चंद्र-सूर्य..आणि रात्रीच्या अंधाराला चंद्राला आणखी अगणित हात म्हणून तारका दिल्या… आणि या सगळ्यांची काळजी घेणारा आणि सर्वत्र विहार करणारा वायू दिला… पुढे या सगळ्याची सुंदर गुंफण होऊन ऋतुचक्र सुरू झालं…विविध ऋतू काही काळाने बदलत गेले..मग त्या त्या ऋतूमध्ये वाढणारी झाडं-फळं-फुलं आली.. अगदी...

कोकण कन्या!

Image
कोकण कन्या! शिर्षकावरून साधारण लक्षात येऊ शकतं की अशा नावाची एक रेल्वे म्हणजेच ट्रेन आहे..आणि माझ्यामते त्या ट्रेनचं नामकरण करणारा माणूस थोर आहे!! कोकणची कन्या म्हणवून घ्यायला त्या निर्जीव ट्रेनला सुद्धा अभिमान वाटतो..तर आम्हाला किती वाटत असेल ह्याचा अंदाजच करावा! आमचो कोकण म्हणताना जे मूठभर मास चढतं त्याने मी सुद्धा थोडी जाड दिसत असेन! तर आज पुन्हा एकदा, बरेच वर्षांनी कोकण कन्येने प्रवास करायची संधी मिळाली…थोडं दुःख इतकंच की या वेळी कोकणात न जाता ती कन्या ह्या कन्येला गोव्यात सोडणार होती, सुखरूप! हो..कारण प्रवास एकटीने करायचा आहे! मला नेहेमीच एकटीने प्रवास करायला आवडतं..त्यात तो कोकणातला आणि ट्रेनने म्हणजे तर चार चांद! त्यामुळे reservation करताना ACचे पर्याय आणि घरातल्यांच्या सूचना सपशेल धुडकावून माझ्या लाडक्या साईड लोवर सीटचं स्लीपर कोचचं reservation केलं! कोकणात जाताना कसं खिडकी उघडीच पाहिजे..आमच्या कोकणातली हवा अशी अंगावर घेताना काय सुख मिळतं म्हणून सांगू..आणि इतकी स्वच्छ की तो जळ्ळा AC पण गुदमरत असेल तिकडे बंद डब्यात! आणि एवढं निसर्ग सौंदर्य दिसतं ते काय काचेआडनं बघायचं…...

Happy 1st Birthday!

वाढ दिवस म्हणजे जन्म दिवस…मोठं होण्याचं पाहिलं पाऊल…जाणतं होण्याकडची वाटचाल.. प्रत्येक वर्षी अनेक विविध पैलूंनी समृद्ध होणं.. तसंच प्रत्येक वर्षात काही चूका करणं..आणि ...