Posts

Showing posts from 2019

ऐसा आनंद सोहळा!

Image
काल, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी आमच्या गुरुजींचा वाढदिवस असतो…असायचा… गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला गुरुजींचं देहावसान झालं.. गुरुजी गेल्यानंतर, त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम करायचा हे गेल्या वर्षीच ठरलं होतं, त्याप्रमाणे अतिशय अल्प अवधीत नियोजन करुन तो गेल्या वर्षी पार पडला.. पण त्याचं नेमकं स्वरुप हे या वर्षी स्पष्ट झालं.. काल प्रचंड उत्साहात आणि लोकांच्या अलोट गर्दीत संपन्न झालेल्या "पंडित तुळशीदास बोरकर जयंती समारोहाच्या" द्वितीय वर्षाचे पहिले कलाकार होते, श्री.केदार नाफडे..गुरुजींचे ज्येष्ठ शिष्य..जे अमेरिकेत स्थायिक आहेत व आपलं करियर सांभाळून संवादिनीचा, पी.मधुकर घराण्याचा प्रचार व प्रसार सातासमुद्रापार यशस्वीपणे करीत आहेत.. त्यांनी गुरुजींचे गुरु, पी. मधुकर यांनी निर्मिलेला राग मधूयमनीने सुरवात केली..त्यानंतर त्यांनी "नच सुंदरी करु कोपा हे नाट्यगीत सादर केलं त्यानंतर एक द्रुत तीनतालातील दिनकरराव अमेम्बल यांची सुंदर रचना सादर केली व सादरीकरणाचा शेवट केला गुरुजींना प्रिय असलेल्या उस्ताद बिस्मिल्ला खान यांची एक धून वाजवून.. गुरुजींव...

God's Gift!

Image
"Same to you 🙂." तिने साधारण सदूसष्ठावा रिप्लाय केला आणि फोन बाजूला ठेवला. आज ऑफिसमध्ये सुद्धा अगदी २-३ लोक आले होते. तिने पुन्हा लॅपटॉप मध्ये नजर टाकली आणि कामात गुंतली. तेवढ्यात दारावर कोणीतरी नॉक केलं..मोहोम्मद आला होता.. "आओ मोहोम्मद" "मॅडमजी सारा काम तो हो चुका, मै आज जलदी निकल जाऊ तो कोई दिक्कत तो नही होगी ना आपको..?" "नही..I'll manage" "जी thank you मॅडमजी..वो क्या है ना बच्चे माने नही, बोले अब्बू आज तो पटाके लेने बडे मार्केट जाएंगे..तो अभि जाऊंगा थोडी भीड कम मिलेगी" "कोई बात नही..पर पटाके क्यू..? अपकाभी त्योहार है..?" "अरे मॅडमजी..दिवाली है ना..वो क्या है बच्चोके दोस्त सब मनाते है, अच्छे कपडे पेहनते है, पटाके जलाते है..फिर मेरे बच्चे क्यू ना करे..!" "अच्छी बात है, खर्चा भी ज्यादा होता होगा ना..?" "हा थोडा होता है, आप बोनस भी तो देती हो..और बच्चोकी मुस्कान देख के बडा अच्छा लगता है!" "ये बात तो है!" "मॅडम आप ये त्योहार को भी काम करती है, आपका परिवार नाराज नही होता..?...

पहिलं वहिलं!

Image
टिंग टॉंग.. नील पसाऱ्यातून वाट काढत दारापर्यंत पोहोचतो आणि दरवाजा उघडतो! कस्तुरी - Surprise! नील - ये बात!! काय वेळेवर आलीस म्हणून सांगू! मी विचारच करत होतो आता हा पसारा कसा आवरावा! कस्तुरी - शहाणाच आहेस! मी एवढ्या लांबून तुला surprise द्यायला आले तर तुला पसाऱ्याचं पडलंय! लोकं होणाऱ्या बायकोला फुलासारखं जपतात..आणि तू..? नील - छे छे.. तू काही आवरु नकोस..मदत कर आपली थोडीशी! हे एवढं शिफ्टिगचं काम झालं की जपेन हा तुला फुलासारखी! कस्तुरी - बघूया हा! आत्ता आधी हा गोंधळ आवरुया! तरी सांगत होते movers and packers कडे देऊ..ते सगळं करतात नीट! नील - सामान उचलायला बोलावलंच आहे की त्यांना उद्या! पण त्यांना कसं कळणार कुठल्या आठवणी एकत्र ठेवायच्या आणि कुठल्या वेगळ्या आणि कुठल्या मागे सोडून जायच्या.? कस्तुरी - बरं बाबा..हरले! पण हे मात्र खरं हा..प्रत्येक वस्तूत एक आठवण दडलेली असते! ह्या घरात राहून सुद्धा आता ५ वर्षं होतील ना तुला..? नील - हो..४ वर्षं १० महिने आणि १३ दिवस! कस्तुरी - Yes Mr. Perfectionist! नील - खूप आठवणी आहेत ह्या घरात सुद्धा! पहिल्यांदा एकटं रहायचा अनुभव इथूनच घेतला मी..ते...

Folks-Wagon - एक सर्वांगसुंदर सांगीतिक अनुभव!

Image
संगीत हे विश्वव्यापक आहे हे निर्विवाद सत्य आहे.. भारतीय संगीत हे विविधतेने नटलेलं, सौंदर्यपूर्ण आहे हे सुद्धा निर्विवाद सत्यच आहे.. शास्त्रीय, उप-शास्त्रीय, सुगम, लोकसंगीत व हल्ली चर्चेत असलेलं पाश्चात्य संगीत असे ठळक प्रकार बहुदा सगळ्यांना माहीत असतात. भारतात भाषा आणि संगीत हे प्रांताप्रांताप्रमाणे बदलत जातं, तसंच प्रत्येक प्रांताच्या संगीतात वापरली जाणारी वाद्य सुद्धा बदलत जातात. प्रत्येक प्रांतात आपलं म्हणावं असं विशेष संगीत आहे आणि त्यालाच आपण लोकसंगीत असं म्हणतो, कारण ते त्या त्या लोकांचं संगीत असतं.. ह्याच लोकसंगीताचा ध्यास घेतलेला एक वेडा मुसाफ़िर म्हणजे मधुर पडवळ आणि त्याबरोबरच त्याचा अख्खा फ्लोक्सवॅगन हा बँड..ह्या ग्रुपचं नावंच मुळी "Folks-Wagon" असं ठेवलं आहे..वॅगन म्हणजे काही वस्तू इकडून तिकडे नेणारी गाडी..तसंच सगळ्या प्रांतातील सांगित रसिकांपर्यंत पोहोचवणारा यांचा हा बँड, फोक्स-वॅगन! ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही मंडळी त्या त्या राज्यात, प्रांतात जाऊन, तिथे राहून तिथल्या कलाकारांकडून हे संगीत शिकतात, वाद्य शिकतात आणि त्यांचा निश्चय बघून तिथले लोक ही कुठेही...