Posts

Showing posts from 2020

Connecting Connections!

Image
To connect, is to bring together! A connection is established when two things are linked or associated together! But what if all these connections are again connected? That is what I meant by connecting connections! So here I am writing about a beautiful experience we had yesterday, that is on 25th of August 2020, of course virtually (maybe secretly thanking the pandemic situation in mind.) The concept was of Kedar Naphade dada who is a senior disciple of Pt.Tulsidas Borkar guruji and is currently located in New Jersey. The idea was to take a week, schedule 4 sessions of two hours each, per day and include people or students all over the world in their preferable time slots, grouping them in 4 per session.  Each session was very well articulated, the structure being - Everyone joining over video call, firstly discussing about what is to be practiced and then taking a specific taan/alaapi/alankar/palta and practising it for 10 minutes by muting themselves. Then after 10 minutes each...

व्रतस्थ...

Image
असेही व्रतस्थ.. प्रिय डायरी, आज खूप दिवसांनी तुझ्याकडे आले म्हणून रुसली नाहीयेस ना गं..? पण तुलाही सांगितलं होतंच की..आमचं लग्न ठरल्याचं.. त्यामुळे तुझ्याशी कमी आणि त्याच्याशीच बोलणं जास्ती व्हायचं...तेवढं तर घेशीलच की समजून... लग्नाची तारीख अशी दोन महिन्यावर आली असताना हा कोरोना येऊन ठाण मांडून बसलाय..कुठे जाणं नाही, कुणाला, म्हणजे अगदी अमितलाही भेटणं नाही..खरेदी नाही, निमंत्रणं नाही..काही काही नाही.. आणि त्यात जीवाला सतत घोर..माझं ऑफिस सुरू नाहीये, मी घरूनच काम करतीये..आई-बाबा सुद्धा घरीच आहेत...पण आता एवढं एकच घर नाही ना माझं..? अमित रोज कामावर जातोय..सुट्टी वगैरे सब झूठ..कधीकधी तर ऑफिस मध्येच रहातोय..ठिकठिकाणी जाऊन लोकांची परिस्थिती  पडताळतोय..अगदी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर्सची मुलाखत सुद्धा घेतोय..काय करावं अशा वेळी..? जीवाला घोर लागणार नाही तर काय..? मग तर लग्नाची तारीख उलटून गेली तरी स्वस्थ बसून राहण्याशिवाय दुसरं काही करता आलं नाही...त्या दिवशी फक्त अमित ऑफिसला जाताना मित्राची बाईक घेऊन बिल्डिंग खालून गेला..काही मिनिटं थांबला..ती नजरानजर झाली तेवढीच...तो सुद्धा ...

खम्माघणी राजस्थान - भाग ५!

Image
भाग ५ आम्ही पहाटे जोधपूरला पोहोचलो, स्टेशहून झोस्टेलला जायला ओला केली होती, ती सुद्धा वेळेत आली आणि आम्ही मार्गस्थ झालो.. भल्या पहाटे कुठलंही शहर सारखंच दिसत असावं…untouched beauty म्हणतात तसं! बऱ्याच गल्या गल्या असणाऱ्या भागात आम्ही पोहोचलो आणि  एका जागी द्रायव्हरने गाडी थांबवली, आणि पुढे गाडी जाणार नाही सांगितलं…झालं, मग आम्ही आणि बॅग्स असं पायी झोस्टेलकडे..तसं अगदीच जवळ होतं ते, एका गल्लीत शिरुन पुन्हा लगेच डावीकडे गेलं की समोरच…पण तेवढ्या वेळात आमच्या ट्रॉली बॅग्सचा जो काही आवाज होत होता त्याने सगळी वस्ती जागी होते की काय असं वाटलं! तर एकदाचे आम्ही पोहोचलो, झोस्टेल या चेन ची खासीयतच आहे ते म्हणजे त्यांचं इंटिरियर, ब्राईट vibrant कलर वापरून, आणि authentic वस्तूंनी सजवलेली जागा कोणाला आवडणार नाही! तर आत गेलो, पण मानून कुणी दिसेना, साधारण सहा वाजले होते आणि त्यात दिवस थंडीचे..खरंतर अशात कुणाची झोप मोडायचं पातकच लागत असणार, व काय करणार..पर्याय नव्हता मग आवाज देऊन, टेबल बडवून, त्यानेही काही होईना म्हणून फोन करुन थोड्या वेळाने कुठून तरी एका माणसाचा आवाज आला, आणि मग तो साक...

खम्माघणी राजस्थान! भाग ४

Image
या सगळ्या दरम्यान अंगावर तीन थर होतेच…आणि परत जाताना थंडी आणखी वाढलेली..कॅम्प मध्ये गेल्यावर तिथे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची तयारी होत आलेली दिसली..अंधार बऱ्यापैकी पडला होता थोडं फ्रेश होऊन बाहेर येऊन बसलो…चहा-पोहे आले…तिकडचे पोहे म्हणजे गोड आणि भरभरून तेल असलेले…आणि कार्यक्रम सुरू झाला केसरिया बालम ने…दरम्यान आमच्या शेजारी थायलंडचे दोघे, बंधू-भगिनी येऊन बसले…त्यांच्याशी थोडी ओळख होत होती…एकीकडे कार्यक्रम गाण्यावरून नृत्याकडे आलेला..तिथले स्थानिक नृत्य प्रकार झाल्यावर काही थोडे अघोरी प्रकार (पापणीने सुई उचलणे, काचांवर चालणे इत्यादी) झाल्यावर डोक्यावर घागरी/घडे घेऊन नृत्य झालं…मग जेवण करुन, आणि दुसऱ्या दिवशी थायलंड जोडीबरोबर एकत्र जैसलमेरला जायचं ठरवून, एकमेकांचे नंबर घेऊन आम्ही आपापल्या ठिकाणी गेलो.. दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तो माणूस आम्हाला न्यायला आला..पुन्हा ओपन जीप सवारी आणि प्रचंड वाऱ्यात प्रवास झाला! त्या दिवशी आमचा मुक्काम नव्हता, रात्री उशिराची ट्रेन होती तरीही आम्ही झोस्टेलचं बुकिंग केलेलं..जो निर्णय अतिशय उत्तम ठरला! राजपुत योध्दा रावल जैसल यांनी बांधलेला हा अत्यंत मनोह...

खम्माघणी राजस्थान! - भाग ३

Image
ते मनोहर दृश्य मनात साठवून आम्ही स्टेशनच्या आत गेलो, थोडावेळ वेटिंग रुम मध्ये थांबलो व नंतर प्लॅटफॉर्मकडे निघालो..जयपूर रेल्वे स्टेशनला लिफ्टची सुविधा सुद्धा आहे हे तिथे एक बोर्ड बघून कळलं, बॅग्स असल्याने आणि थंडीने हात सुन्न पडल्याने त्याचा खूप फायदा झाला..आणि आम्ही प्लॅटफॉर्मवर अगदी वेळेत पोहोचलो..गाडी सुद्धा वेळेवर आली.   तशा आम्ही दोघीच मुली आणि रात्रीचा प्रवास, खरंतर घरचे नेहेमी अशावेळी AC चं तिकीट काढायला सांगतात..पण या वेळी मी ठरवून स्लीपर क्लासचंच तिकीट काढलेलं, फक्त त्यात लेडीज कोट्यात काढलं, ही सुद्धा एक उत्तम सुविधा भारतीय रेल्वे देत आहे. फक्त तोटा एवढाच होतो की स्लीपर क्लास मध्ये अंथरूण, पांघरूण दिलं जात नाही. पण आम्ही त्या तयारीनिशी गेलेलो, तरीही थंडी इतकी प्रचंड होती की खिडकीच्या फटीतून येणाऱ्या वाऱ्याने हुडहुडी भरत होती! तरी दमल्यामुळे पूर्ण गुर्गटून पांघरूण घेऊन झोपलो..आणि दुपारी १ दरम्यान जैसलमेरला पोहोचलो.. आमचा ठरलेला प्लॅन असा होता की जैसलमेरला दोन दिवस ठेवलेले, त्यापैकी आज आम्ही सरळ वाळवंटात, म्हणजे "सम" येथे जाऊन तिथे "Desert Camp" ...

खम्माघणी राजस्थान! - भाग २

Image
दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो, नाश्त्याला वेळ न घालवता घरुन नेलेले डिंकाचे लाडू खाल्ले आणि पुन्हा बसने आमेरकडे निघालो..आमेरला जाताना वाटेतच जल महल सुद्धा दिसतं! तर आमेरला पोहोचलो.. आत जात असताना अनेक गाईड तुमच्या मागे लागतात.. नजर काम करते. माणूस पारखून घेणं अतिशय महत्वाचं आहे, तरच दिलेले पैसे वसूल होतात! अशा चार पाच लोकांना नाही म्हणून सहाव्याला नाही म्हंटलं आणि तो मागे मागे नाही आला. बऱ्यापैकी वयस्कर आणि अनुभवी दिसत होते काका. मागे गेले त्यांना म्हंटलं किती घेणार तर म्हणाले २००. म्हंटलं १५० फायनल. आणि ते आमच्याबरोबर आले. (खरं हत्तीवरून जायचं म्हणून दुसऱ्या दिवशी गेलो, पण त्याचं तिकीट ₹११०० हे ऐकून रद्द केलं!) सुरवातीलाच आत शिरताना उजवीकडे एका  वाड्याचे भग्न अवशेष दिसतात..पण ते ही खरंतर आकर्षक दिसतात!  पुढे थोडं वरती गेलं की खाली माओटा तलाव दिसतो..आणि त्याच्या मध्ये दिसते ती केशर बाग..राजा काश्मीरला गेले होते तेव्हा त्यांना केशर खूप भावलं आणि त्यांनी एक मोठी रक्कम देऊन ते इकडे लागवड करायला आणलं, पण राजस्थानातील हवामानामुळे तो प्रयत्न सफल होऊ...