ऋषिकेश-मसुरी - भाग ५!
त्रिवेणी घाट म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम आहे..असं मानलं जातं की जराचा बाण जेव्हा श्रीकृष्णाला लागला तेव्हा भगवान या ठिकाणी आले होते.. आणि तिर्थक्षेत्र म्हणून ऋषिकेशचं जे महत्व आहे, ते या ठिकाणी सर्वात जास्ती आहे..गंगेत पापं धुतली जातात असं म्हणतात, हेच ते ठिकाण! इथलं जे आरतीचं स्थळ आहे, तिथे असा लांब पॅच आहे..खाली पुजाऱ्यांसाठी लेव्हल लावलेल्या आणि त्या मागे पायऱ्या केलेल्या आहेत ज्यावर लोकं बसतात.. आधीपासूनच तिथे मागे live भक्तीगीत गायन सुरू होतं.. पेटी घेऊन ते गृहस्थ गात होते..तबला संगत होती..आणि ऑक्टोपॅड वाजवणारा एक माणूस होता.. मग काही वेळात महाआरतीला सुरवात झाली.. जवळजवळ १०-१२ विविध वयोगटातील पुजारी हातात दिवे घेऊन त्यांच्या जागेवर आले..आणि मग त्या गायकाने आरतीला सुरवात केली.. आधी सुरू असणाऱ्या गाण्यांना एकवेळ ड्रमचे वगैरे इफेक्ट चालून गेले..पण आरतीला सुद्धा जेव्हा ऑक्टोपॅडवर विविध पाश्चात्य वाद्य वाजू लागली तेव्हा मात्र मला तरी ते कानाला खूप खटकलं..म्हणजे जी शांतता अपेक्षित असते ती काही केल्या मिळेना मग जरा अस्वस्थ वाटू लागतं...