राधा उवाच...नावात दडलंय काय ...?
माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..
कसे….?
सांगते!
राधा…
एकदा ह्या नावाचा अर्थ ऐकला..आणि तो आजवर मनात रुंजी घालत आहे..तो असा,
प्रवाहात मिसळून जाते ती धारा आणि
प्रवाहा विरुद्ध जाते, ती राधा..
आपल्या प्रत्येकाच्या मनात एक राधा दडलेली असतेच की!
जिला कायम प्रवाहाविरुद्ध पोहायचं असतं..
जिचं स्वतःचं असं ठाम म्हणणं असतं!
जी लोक, समाज, केलेल्या गोष्टींचा/कृतीचा परिणाम या सगळ्याला झुगारून स्वैर वावर करायला तयार असते..
त्या राधेविषयी मला कायमच कुतूहल वाटतं..
त्याच राधेला शोधण्याचा प्रयत्न माझ्या लेखणीतून होत असतो बहुतेक...
कधीकधी अगदी सहज गवसते, तर कधी खूप वाट पाहायला लावते!
अशीच आहे ती…गूढ, अगम्य आणि तरीही निर्मळ!
तिने साद घातली की हातात असलेलं काम टाकून तिच्यामागे धावणं हे आलंच!
तसं नाही केलं तर कधीकधी इतकी रागावते कि मग फिरकतच नाही किती दिवस..
तिला खूप जपावं लागतं..
पदार्थातल्या चिमूटभर मिठासारखी आहे ती!
नसली तर अळणी, आणि जास्त झाली तर खारट!
म्हणूनच मला नेहमी वाटतं प्रत्येकाने 'तिला', आपल्यातल्या राधेला
चिमूटभर जागा द्यावी आपल्या आयुष्यात!
आणि मग चव घ्यावी ह्या सुंssदर जीवनाची..
नाहीतर अळणी आयुष्य जगणारे काही कमी आहेत का..?
आयुष्याचं गाडं ओढत असतात बिचारे..पण त्यातला आनंद काही घेता येत नाही त्यांना!
म्हणूनच वेळीच ऐकावी राधेची साद..
आणि द्यावी तिला योग्य दाद!
माझ्यातल्या राधेची एक साद म्हणजेच माझं लिखाण..आणि त्यातून निर्मित होत असलेला हा ब्लॉग प्रपंच!
म्हणून त्याचे नाव 'राधा उवाच..!' :)
तुमच्या प्रतिसादाची आणि प्रतिक्रियांची वाट बघत आहे! :)
तुमचीच,
राधा….उर्फ
कांचन लेले :)
Apratim ....pudhil likhanasathi tula manapasun shubechha
ReplyDeleteApratim ....pudhil likhanasathi tula manapasun shubechha
ReplyDeleteThank You So Much Kaustubh.. You have been a great support and I know you always will be! :)
DeleteKanchan.. Tuzyatalya radhela kevhach olakhalay mi.. Mhanunach ya blog prapancha sathi mazya tula khup khup shubhechha..
ReplyDeleteThank You so Much for all the support! :)
DeleteSuperb I hope u write more and more stuff and looking forward for the new hobby u have found !!!!
ReplyDeleteThank you sooo much Taii :)
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteवा.लई भारी!!
Deleteसंवादिनीवर लिलया सूर आळवणार्या या हातांत हे कसबही आहे ह्याचा आनंद वाटला. तुझा गिरनार बद्दलचा लेखही सुंदर होता. तुझ्यात जात्या असलेलं हे राधापण असंच संभाळ. कोडकौतुक कर तिचं. फार कमी जणींना लाभतं हे लेणं. तुला पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
Deleteधन्यवाद मामाश्री ;) :)
DeleteThank You So Much Nayana Atya..!! :)
Deleteराधा उवाच!अप्रतिम ! पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!
ReplyDeleteधन्यवाद :)
DeleteReally well written Kanchan. A simple idea expressed so beautifully. Best of luck for your blog.
ReplyDeleteThanks Siddhant! :)
DeleteWow kanchan opps Radha , khup mast lihilays ajun khup lihi ,khup khup shubheccha tuza blog prapancha sathi - OMKAR
ReplyDeleteThanks a lot Omkar! :)
DeleteMastach! 👏🏼 Keep up your writing.. Would be waiting for new posts! 😊 good luck!
ReplyDeleteThanks a lot Mrudula tai :)
DeleteI never knew you had a blog!!
लेख अतिशय सुंssदर आहे.आणि गिरिनार चा उल्लेख् अप्रतिम.आम्ही ही अनुभव घेतला आहे.
ReplyDeleteपुढील लेख ब्लॉग वर येताच वाचला जाईल.
i hope you next write on Rameshwar.(south india)
अनिरुद्ध काळे(व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र)
खूप आभार...!
Deleteसुचलं तर नक्की लिहीन..
Good one
ReplyDelete