Posts

Showing posts from January, 2017

Being Woman

Being Woman! Yesterday was one such busy day that I had no time even to have food ! In the evening as I ran to the station (already exhausted) to reach my class which was mere two stations away.. It was 5.30 pm.. It just takes 17 minutes to reach my class which was scheduled at 6..still being a Kobra..Reaching 5-10 minutes before time is mandatory! ;) I hurriedly reached the station and searched for a working ATVM machine to get my ticket.. At such times being third in the queue of ATVM machine also seems irritating.. After few minutes I got my ticket and ran to the bridge..it was the middle bridge and I had planned to board the last compartment, which meant I had to walk all the way to it before the train departed... The train was announced even before I was even on the bridge..I increased my speed from 100 to 150 in typical Mumbai style.. As I was getting down the bridge to the platform I saw a pregnant woman slowly climbing down the stairs.. Within a microsecond my speed wa...

Demonetization

#Demonetization आज पहिल्यांदाच सध्याच्या ज्वलंत विषयावर बोलत आहे! सरळ बघायला गेलं तर काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचललेलं एक पाऊल.. खळबळ मा...

गिरनार - एक अद्भुत अनुभव..!

Image
काल एका पोस्ट मध्ये गिरनारचा उल्लेख आला आणि फेब्रुवारी २०१६ रोजी केलेल्या गिरनार यात्रेच्या आठवणी ताज्या झाल्या.. आम्ही १४ जण होतो..साधारण वयोगट १२-७२..गिरनार ला जायच्या आधी ८ दिवस आमचा श्री क्षेत्र सोमनाथ येथे मुक्काम होता..कारण होतं जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण..हा योग साधून आला तो माझे गुरू श्री.अंकुश दीक्षित यांच्यामुळे, ज्यांच्याकडे मी संगीत शिकत आहे (आम्ही त्यांना सर असं संबोधतो..पुढील उल्लेख तसाच येईल)..मुंबईतून निघताना गिरनार कडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे एक challenging trek असा होता..९,९९९ पायऱ्या असलेले तीन डोंगर असं सारखं घुमत होतं डोक्यात…पण सोमनाथ मधले दिवस जसे उलटत गेले तसा दृष्टिकोनही बदलत गेला..आता ओढ लागून राहिली होती ती दत्तगुरूंच्या दर्शनाची… गाथा पारायण झाल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो गिरनार कडे..साधारण रात्री ९ च्या दरम्यान पोहोचलो आणि गाडीतून खाली उतरता क्षणी डोळ्यात भरली ती डावीकडे दिसणारी दीपमाळ…मिट्ट काळोख आणि जणूकाही हवेतच तरंगत असलेले पांढरे दिवे गिरनारच्या पहिल्या टप्प्याची उंची दाखवत होते..नुसतं बघत रहावं असं दृष्य.. रा...

आकाशात उंच झेप घेताना..!

आकाशात उंच झेप घेताना… तारिख- ८ जून २०१६. स्थळ- मुंबई. साधारण ५.३० च्या दरम्यान टॅक्सी विमानतळाच्या बाहेर थांबली..एक मोठी बॅग आणि एक माझं अर्धांग, म्हणजे पाठीवरची सॅक, अशा दोन बॅगा घेऊन प्रवेशद्वारातून पदार्पण केलं..थोडं पुढे गेल्यावर चेक-ईन लगेज जमा करायचं काउंटर होतं, तिकडे बॅगेचं वजन झालं आणि जशी ती आत जाऊ लागली तसा माझा ऊर भरुन येत होता..परत दिसेल ना, आहे तशीच पोहोचल्यावर मिळेल ना, ह्याच कार्गो मधून येईल ना ई. विचारांना झुगारुन पुढे गेले तरी एकदा वाटलंच कि एक काळी तीट लावायला हवी होती.. पुढे घेतलेले टॅग माहिती भरुन अर्धांगावर अडकवले आणि पुढे माझी आणि अर्धांगाची झडती झाली..सुखरुप सुटलो..आणि मग काय..आता जवळपास दीड तास होता..मग थोडा फेरफटका मारला आणि एके ठिकाणी बसले..थोड्यावेळ भ्रमणध्वनी तपासला आणि शेवटी हुकमी एक्का म्हणून एक जाड पुस्तक काढुन बसले..कसा वेळ गेला कळलं सुद्धा नाही..पुस्तक हातात घेतलं तेव्हाची तुरळक लोकसंख्या आता तुडुंब म्हणण्याइतपत झाली होती...रांगेत उभी राहिले आणि ५ मिनिटात झाला विमान प्रवेश..!  विंडो सीट आधीच घेतल्याने आरामात लाईनीत शेवटी उभी होते…बस आ...

नातं.. (भाग ४)

भाग ४.. विहानला पूर्ण शुद्ध आली नव्हती..अर्धवट शुद्धीत तो बरळत होता.. 'आदू.. अदिती…' हे शब्द कानी पडताच त्याच्या आईने डोळ्यांना पदर लावला..वडिलांनी त्याला हाका मारुन शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला…पण व्यर्थ..शेवटी न राहवून वडिल त्याला समजावत म्हणाले 'आदू येईल हा बाळा..तू लवकर बरा हो आधी..' इकडे त्याच्या मित्रांना काहीच समजेना..तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितलं की त्याची लहान बहीण अदिती दोन वर्षांपूर्वी देवाघरी गेली होती..त्याचा त्याने खूपच धक्का घेतला होता..आणि म्हणूनच खरंतर ते वर्षभरापूर्वी जुनं सगळं सोडून ह्या शहरात रहायला आले होते.. पण इकडे आल्यापासून विहान बराच सावरला होता..मग असं मधेच काय झालं..? आणि तो जर नीरजाच्या धसक्याने असा झाला होता तर मग अदितीचं नाव का घेत होता..? कोणालाच काही कळेना..शेवटी सगळे त्या दिवशी तसेच घरी गेले.. प्रितीने नीरजाच्या बाबांच्याच्या फोनवर फोन केला आणि तिला सगळं कळवलं..तिला मोठा धक्काच बसला..इतकं भयंकर काही होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं..तिला तिचं मन खात होतं..सुदैवाने ती दुसऱ्याच दिवशी सकाळच्या फ्लाईटने परतणार होती.....

नातं.. (भाग ३)

भाग ३.. नीरजाच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं… एकीकडे तिला विहानचं विचित्र वागणं छळत होतं..तर दुसरीकडे जवळ येणाऱ्या परीक्षेची काळजी छळत होती.. परीक्षेच्या दृष्टीने आत्ता कुठलीच हालचाल करणं योग्य नाही असं तिला खूप विचारांती लक्षात आलं होतं... सध्या या सगळ्याकडे दुर्लक्ष करु, अभ्यास व्यवस्थित झाला आणि परीक्षा झाली की नंतर या प्रकरणाचा छडा लावू असं तिने मनाशी पक्के ठरवले.. विहानच्या खरेपणाबद्दल तिला मनोमन खात्री होती..पण तरी कुठेतरी एक धाकधूक होती की सगळे म्हणतात तसा खरंच तो प्रेमात पडला नसेल ना माझ्या..? पुन्हा मनात विचारांचा कल्लोळ उठला..तिने स्वतःला शांत केलं..आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम रहायचा निग्रह केला, पण त्याचबरोबर विहानला कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन द्यायचं नाही असंही तिने ठरवलं. . दिवस जात होते...परीक्षा जवळ येत होती..अभ्यासाच्या निमित्ताने भेटी खूपच कमी झाल्या होत्या...पण तरी विहान रोज नीरजाला फोन करतच असे..मधेच एखाद दिवशी तिच्या घराजवळ जाऊन तिला फोन करुन खाली बोलवत असे व मग कधी 'सहजच इकडे आलो होतो म्हणून म्हंटलं भेटू तुला' तर कधी 'अमक्या विषयाच...

नातं.. (भाग २)

भाग २.. 'Hello..? कुठे तंद्री लागली आहे साहेब..? थंड होईल ना भाजी..टूट पडो!' ..दोघांनी पावभाजी फस्त केली आणि निघाले.. 'चल मी निघते..उद्या कॉलेजला भेटू..' 'अगं मी येतो ना तुला सोडायला..' 'नको रे..इतका काही उशीर नाही झालाय..मला सवय आहे..' 'मला आत्ता काही काम नाहीये..आणि तेवढीच तुला कंपनी..!' विहानने हट्टच केला..मग नीरजानेही ऐकलं त्याचं..तिला त्याचा एवढा आग्रह थोडा विचित्र वाटला पण तिने तितकं सिरियसली घेतलं नाही.. विहान गप्पा मारता मारता नीरजाच्या आवडी-निवडी, शाळा, घरचे इ. बऱ्याच विषयांची माहिती काढून घेत होता.. आणि ते तिच्या घरापाशी पोहोचले..ती त्याला bye म्हणून निघाली..तो मात्र थोडा वेळ तिथेच रेंगाळला… दुसऱ्या दिवशी मैत्रिणींनी नीरजाला आणि मित्रांनी विहानला खोपच्यात घेतलं…पण दोघांकडूनही निराशाच पदरी पडली..!  पण त्या दिवसानंतर विहानचं वागणं मात्र बदलत चाललं होतं.. एरवी जोडप्यांच्या ग्रुपमध्ये बोर होतं असं म्हणणारा विहान आता सारखा ग्रुप बरोबर दिसू लागला.. काही दिवसांनी सगळ्यांना कॉलेजकडून स्टडी लिव्ह मिळाली...त्यामुळे कॅन्टीन आणि...

नातं.. (भाग १)

भाग १ विहानला आज त्यांची कॉलेजमधली, मित्रांनी घडवून आणलेली पहिली भेट आठवत होती.. त्याने शेवटच्या वर्षात कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली होती..पण त्याच्या खुशमस्कऱ्या स्वभावामुळे मुलांनी त्याला लगेच आपलंसं केलं होतं..त्याच्या मित्रांचा आणि आता त्यांच्या खास मैत्रिणींचा असा एक ग्रुप होता.. पहिल्या दोन वर्षात जोड्या जुळल्या होत्या..आणि त्यांच्या भल्या मोठ्या ग्रुप मध्ये एकट्या असणाऱ्या नीरजाबरोबर आता विहानची भर पडली होती... नीरजा..दिसायला देखणी..टॉम बॉय म्हणतात तशी रफ अँड टफ असणारी... मैत्रिणींनी चिडवले तर म्हणायची काय घाई लागलेली आहे तुम्हाला…? कॉलेज लाईफ एन्जॉय करुदे ना सुखाने…मग प्रेम करायला आयुष्य पडलं आहे..! आणि इकडे विहान होता मित्रांना सरळच उडवून लावायचा.. प्रेम-बिम सब झूठ है असं त्याचं स्पष्टच मत होतं...! तरी आता मित्र म्हणजे नाही म्हणेल तेच करायचं असा अलिखित नियमच असतो ना..! एक दिवस ह्याच्या मित्रांनी आणि तिच्या मैत्रिणींनी कट करुन दोघांना एकटं पाडायचं ठरवलं..सगळे भेटले आणि जोड्यांनी काढता पाय घेतला..उरले फक्त विहान आणि नीरजा..तसे ते भेटले होते आधी त्यामुळे जुजबी ओळख ह...

क्षण.. (भाग ४)

भाग ४ दुसऱ्या दिवशी सकाळी उशिराच जाग आली..डोक्यात विचार होतेच पण आता विचार करायला वेळ नव्हता..घरातली कामं उरकून ऑफिस गाठायचं होतं...कसे दिवस सरले कळलंच नाही..अख्खा आठवडा ऑफिस आणि कार्यक्रमाच्या तयारीच्या गडबडीत गेला.. आणि रविवारचा दिवस उजाडला..सकाळीच आईचा फोन आला..आई-बाबा गावाला गेले असल्याने कार्यक्रमाला येऊ शकणार नव्हते..आईने नेहेमीप्रमाणे सूचना दिल्या आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या..खरंतर आपला पहिलाच मोठा कार्यक्रम आणि आई-बाबा तो बघायला नाहीत ह्याचं तिला खूप वाईट वाटत होतं..तिच्या गुरु, म्हणजेच दीदीसुद्धा येऊ शकणार नव्हत्या..खरंतर त्यांचीच जागा घेतली होती तिने ह्या कार्यक्रमात..आता त्यांचं नाव राखणं तिच्या हातात होतं…अजयचं टेन्शन होतंच..पण त्याहीपेक्षा कार्यक्रमाचं टेन्शन जास्ती होतं.. अजय तरी कार्यक्रमाला येईल..? छे..त्याला तर कुठल्याच कला प्रकारची आवड नव्हती…त्याचा फोनही आला नव्हता..कदाचित कार्यक्रमानंतरच बाहेर भेटेल... तिने भराभर तयारी केली..आणि देवासमोर हात जोडले..मनोमनच तिने देवाला 'आता तू बुद्धी देशील तसं...मला काय करावं  काही समजत नाही..' असं विनवल...

क्षण.. (भाग ३)

भाग ३ घरातली कामं आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करुन अनन्या झोपायला गेली..पण काही केल्या झोप लागत नव्हती..ह्या कुशीवरून त्या कुशीवर असं सारखं चालू होतं.. तिला आठवत होता कॉलेजमधला अजय.. देखणा, हुशार पण रागीट आणि जssरा ताठ.. लोकांना वाटायचं श्रीमंत घरचा आहे म्हणून आखडतो..पण तिने त्याला ओळखलं होतं..त्याला एकटं किंवा ठराविक माणसांमध्येच रहायला आवडायचं..कदाचित तो तश्याच वातावरणात वाढला होता म्हणून असेल..कोणी हस्तक्षेप केला, जास्ती जवळीक साधायचा प्रयत्न केला तर साहेबांचा पारा चढलाच..आणि ह्या अगदी उलट होती अनन्या.. पाण्यात साखर विरघळावी तशी मिसळायची कोणातही.. जssरा हट्टी ती सुद्धा होतीच..एकुलती एक होती ना..पण अतिशय लाघवी होती.. तिचं आणि अजयचं ट्युनिंग कधी जमून गेलं कळलंच नाही तिला.. अजयने तिला पहिल्यांदा प्रोपोझ केलं तेव्हा ते फर्स्ट इयर ला होते..तेव्हा तिने 'मला एवढ्यात ह्या सगळ्यात पडायचं नाही' असं म्हणून बोळवण केली होती त्याची..त्यानेही निमूटपणे ऐकलं आणि वाट बघितली होती…मग दुसऱ्यांदा प्रोपोझ केलं तेव्हा तिचं ग्रॅज्युएशन होऊन तिने MCom ला ऍडमिशन घेतली होती.. तेव्हा तिने त्याल...

क्षण.. (भाग २)

भाग २ परत फोन करावा कि न करावा अशा संभ्रमात असतानाच बस आली..तिने पटकन फोन पर्स मध्ये टाकला आणि गर्दीत सामावून गेली.. डोक्यात मात्र 'कशाला बरं फोन केला असेल अजयने..?' हेच होतं.. तेवढ्यात तंद्री भंग करायला कंडक्टर आला..तिने तिकीट काढलं आणि परत विचार करण्यात मग्न झाली.. अजय आणि अनन्या खूप चांगले मित्र असूनही फोनवर फार बोलणं व्हायचं नाही..बोलणं खूप व्हायचं ते आधी मेसेजवर, मग whatsapp किंवा फेसबुक वर..कॉलेजमध्ये असेपर्यंत भेटायचे पण त्या नंतर मुद्दाम असे एक-दोनदाच भेटले होते ते..दोन वर्षं झाली असावीत शेवटच्या भेटीला..तिलाही नीटसं आठवेना.. हल्ली बरेच दिवसात बोलणंच झालं नव्हतं..दोघांचेही कामाचे व्याप वाढले होते, जबाबदारी वाढली होती आणि सहाजिकपणे स्वतःसाठी वेळ कमीच मिळायचा.. तिचा स्टॉप आल्यावर ती उतरली आणि घराकडे चालू लागली.. घरी पोहोचते न पोहोचते तोच अजयचा मेसेज आला.. 'Hi..क्लास घेत होतीस का गं..? Free झालीस कि फोन कर..थोडं महत्वाचं आहे.. :) ' तिला आपल्या श्वासाची लय वाढल्यासारखी वाटली.. 'महत्वाचं' म्हणजे काय ह्याचा तिला पूर्ण अंदाज होताच.. तिला काही ...

क्षण.. (भाग १)

भाग १.. "Thank you ताई..bye..!!" "Bye, नीट जा हा.." मुलं निघाली..क्लास संपला होता आणि म्हणजेच रविवारचा हक्काचा सुट्टीचा दिवसही संपत आला होता.. अनन्याने विचार झटकले, बांधलेली ओढणी सोडून नीट घेतली, पर्स घेतली आणि क्लासच्या खोलीला कुलूप लावून चावी वॉचमन काकांकडे दिली आणि ती निघाली.. अनन्या..एक मध्यमवर्गीय घरातील आई वडिलांची एकुलतीएक लाडकी लेक.. नाकी डोळी सुंदर..रंग सावळा..सडपातळ बांधा आणि त्याला साजेल अशी मध्यम उंची..  अभ्यासात बऱ्यापैकी असायची अनन्या, तिने BCom आणि नंतर MCom केलं व बँकेत नोकरीला लागली पण तिचा विशेष गूण म्हणजे नृत्य..! लहानपणापासूनच कथ्थक शिकली आणि त्यात यंदा विशारद  झाली.. ऑफिस सांभाळून शनिवार-रविवारी ती मुलांना कथ्थक शिकवत असे.. पाय थिरकू लागले की एका वेगळ्याच जगात जायची ती..तिचा बोलका चेहरा सगळ्या भावना पोहोचवायचा आणि तिचा सावळा रंग चेहरा खुलवायचा… अनन्याने घरचा रस्ता धरला  होता..मध्येच फोन वाजला..अजयचं नाव बघताच क्षणभर ती रेंगाळली... अजय..अनन्याचा मित्र..तसं म्हंटलं तर जवळचा मित्र..शाळा-कॉलेजपासूनचा..श्रीमंत घरचा पण त्याचा कधी माज ...

मृगजळ..

मृगजळ.. आज संध्याकाळी सहज डोकं वर काढलं व्यस्त दिनक्रमातून आणि घेतला कॅमेरा हातात..खरंतर ह्याचं कारण वेगळं होतं..काल कोजागिरी पौर्णिमा होती..रात्री घरी येताना मला सोबत करत होता तो गोल गरगरीत देखणा चंद्र..येतायेतच ठरवलं होतं की घरी जाऊन ह्याला कॅमेरात बंद करायचं, पण घरी आले आणि राहूनच गेलं..तीच रुखरुख दिवसभर छळत होती..म्हणून म्हंटलं चंद्राचा नाही तर निदान मावळत्या दिनकराचा तरी फोटो काढावा..तर..म्हणून कॅमेरा घेऊन गॅलरीत उभी होते. झाडांमधून दिसणारा मावळतीचा सूर्य म्हणजे अप्रतिम दृष्य..पण शेवटी तोही घड्याळाच्या काट्यावर चालणारा..गेला निघून..पण तरी दिवस मोठे असल्याने अजून काही अंधार पडला नव्हता..म्हणून गॅलरीतच रेंगाळले जरा..सहज नजर खाली गेली आणि दिसलं ते जास्वंदीचं झाड..! काय सुंदर दिसत होतं..पूर्ण हिरवं आणि मधेमधे आलेली लालबुंद फूलं..त्याच्या शेजारीच सदाफुलीचं झाड काय बहरलं होतं.. या सदाफुलीची मला गंमतच वाटते..तिच्यात आणि माणसामध्ये किती साम्य आहे नाही..? माणूस जसा थंडी-वारा-ऊन-पाऊस काही काही न बघता कामाचा गाडा ओढत असतो, तशीच हि सदाफुली..ऋतू कुठलाही असो, आपल्याला नेत्रसुख द्यायला सदैव...

Tom and Jerry!

टॉम अँड जेरी! Tom and Jerry! ड्राईव्ह करत असताना अचानक फोनने ओळखीची साद दिली.. निहारच्या नंबरला सेव्ह केलेल्या कस्टम रिंगटोनचा आवाज होता तो.. वैतागलेल्या रियाचा मूड एकदम बदलला.. तिला माहीतच होतं तो काही तिचा वाढदिवस विसरणार नाही.. पण रात्री १२ वाजता विश करायचा नेम मात्र त्याने आज मोडला होता.. पण आज त्याला ते माफ असलं पाहिजे होतं.. तिने आवाज ऐकताक्षणी मोबाईल घेण्यासाठी हात पुढे केला, आणि मग लगेच मागे घेतला.. 'बघूदे थोडी वाट..मी नाही वाट बघितली रात्रीपासून..? मान्य आहेत सगळी करणं...पण काय झालं असतं रात्रीच आठवणीने विश केलं असतं तर..आणि रात्री नाही केलं तर किमान सकाळी फोन तरी करावा..पण नाही..नेहेमीप्रमाणे मेसेज केला असेल.. आता विसरेलच तो मला.. आज इतके वर्षात पहिल्यांदाच वाढदिवसाला भेटणार पण नाहीये तो.. आता ह्याची सवयच करुन घेतली पाहिजे म्हणा..' ड्राईव्ह करता करता स्वतःशीच अशी बडबड सुरु होती तिची.. 'काय वेड्यासारखे विचार येतायत डोक्यात..त्याची बिचाऱ्याची काय चूक त्यात..? उगाच त्याला दोष देते आहे..आणि बदलत्या परिस्थिती प्रमाणे बदलायला नको का आपण..नवीन लोकांना ...

एक पाऊल..

एक पाऊल.. आज थोडा मूड वेगळाच होता स्वारीचा.. नेहेमीच्या टीप-टॉप, ऑर्गनाईझ्ड दिनक्रमाला झुगारुन लावायचं असा निश्चयच होता मुळी… सकाळी उठल्या उठल्याच मोबाईल बघितला आणि तिचा-त्याचा एकत्र फोटो वॉलपेपर म्हणून दिसला… पुन्हा तीच अस्वस्थता, तीच चिडचिड, तोच इगो, तोच राग… त्याने क्षणभर मोबाईलची स्क्रीन लॉक केली…आणि डोळेही.. बंद डोळ्यांसमोरही आली ती तिच्या गालावर पडणारी खळी.. आणि नकळत उमटलं हसू त्याच्याही गालावर.. मग त्याने डोळे उघडले.. उठून खिडकीपुढचा पडदा सारला.. झरकन आलेल्या प्रकाशाने तो थोडा भांबावला, मग सुखावला.. त्याच्या अंधाऱ्या आयुष्यात असाच प्रकाश घेऊन आली होती ती.. पण त्याने भांबावण्यातच इतका वेळ घालवला कि सुखावायच्या वेळी ती त्याच्यासोबत नव्हतीच… स्वतःच्याच वेडेपणावर आज हसू येत होतं त्याला.. हो, अशाही प्रसंगात हसूच येत होतं..कारण त्याला खात्री होती, ती आजही आहे त्याच्यासाठी..कितीही नाही म्हणाली तरी.. पटकन आवरायला म्हणून गेला..आवरुन नेहेमीचे कडक इस्त्रीचे फॉर्मल कपडे घालून आरशासमोर उभा राहिला… पण त्याला आरशात तो दिसलाच नाही… दिसला एक यंत्रमानव..घड्याळाच्या काट्याच्य...

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा… एकदा ह्या नावाचा अर्थ ऐकला..आणि तो आजवर मनात रुंजी घालत आहे..तो असा, प्रवाहात मिसळून जाते ती धारा आणि प्रवाहा विरुद्ध जाते, ती राधा.. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक राधा दडलेली असतेच की! जिला कायम प्रवाहाविरुद्ध पोहायचं असतं.. जिचं स्वतःचं असं ठाम म्हणणं असतं! जी लोक, समाज, केलेल्या गोष्टींचा/कृतीचा परिणाम या सगळ्याला झुगारून स्वैर वावर करायला तयार असते.. त्या राधेविषयी मला कायमच कुतूहल वाटतं.. त्याच राधेला शोधण्याचा प्रयत्न माझ्या लेखणीतून होत असतो बहुतेक... कधीकधी अगदी सहज गवसते, तर कधी खूप वाट पाहायला लावते! अशीच आहे ती…गूढ, अगम्य आणि तरीही निर्मळ! तिने साद घातली की हातात असलेलं काम टाकून तिच्यामागे धावणं हे आलंच!  तसं नाही केलं तर कधीकधी इतकी रागावते कि मग फिरकतच नाही किती दिवस.. तिला खूप जपावं लागतं.. पदार्थातल्या चिमूटभर मिठासारखी आहे ती!  नसली तर अळणी, आणि जास्त झाली तर खारट! म्हणूनच मला ने...