Posts

Showing posts from 2024

शंभर नंबरी सोनं कांचन!

Image
माझी धाकटी मुलगी कांचन... मला तिच्याबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे. लहानपणी बुद्धीने अतिशय तल्लख पण लाजरी बुजरी असणारी.. तीन वर्षाची असल्यापासून बरेच श्लोक, स्तोत्र तोंडपाठ पण स्पर्धेसाठी कुठे नेलं आणि तिचं नाव घेतलं की रडायला सुरवात आणि आमची वरात परत घरी. मी नेहमी विचार करायचचे, करायचं काय हिचं? हीच्यावेळी गरोदरपणात मी गुरुग्रहाचा बराच जप केला होता, आपण म्हणतो ना गर्भसंस्कार करावेत...त्यामुळे मला असे वाटते त्या जपाचा चांगलाच परिणाम झाला आणि मुलगा झाला नाही पण मी शंभर नंबरी सोन्यासारख्या मुलीला जन्म दिला. कांचन लहानपणापासून खूप सद्गुणी..मग तो जेवणाचा विषय असो की अभ्यास. मला कधी ओरडावं लागलंच नाही. उलट तनुजा, माझ्या मोठ्या मुलीला आम्ही सांगायचो की बघ कांचन कशी जेवत्ये. खरंतर हे मनोगत मी ह्या वर्षी लीहित्ये कारण हा लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवस आहे. आणि नेहमी प्रमाणेच तिच्या लग्नानंतरच्या पाच महिन्यात तिच्या सर्व वागणुकीने मला पुन्हा आश्चर्यचकित केलंय आणि कृतकृत्य केलय. लहानणापासूनच कांचन अतिशय शांत, नम्र. तिच्याकडे नुसतं बघून कधी कळणार नाही की ती खूप हुशार आणि बुद्धिमान