Posts

Showing posts from 2023

प्रवासाचा प्रवास...

Image
प्रवास... जन्माला यायच्या आधीपासून सुरु असतो तो अनेक फेऱ्यांचा प्रवास.. आईच्या पोटात आल्यापासून सुरू होतो तो जीवनाचा प्रवास... आणि जन्म झाल्यावर सुरु होतो तो प्रवासाचा प्रवास! माझा प्रवास सुरु झाला तो बहुतेक कोकणापासून..लहानपणी  कोकणात जाणं म्हणजे एक पर्वणीच असायची! तेव्हा किती सहज उपलब्ध होतं सगळं... नजर जाईल तिथवरची हिरवळ...त्यातल्याही विविध छटा.. शुद्ध हवा..लाल माती...कोसळणारा पाऊस.. तो मातीचा गंध.. आहा! तेव्हा हे सगळं लक्षात यायचं वय नव्हतं..आता मात्र त्याचं महत्व चांगलं कळतं, पण द्यायला तेवढा वेळ कुठून आणता..?! मुंबईसारख्या शहरात रहाणाऱ्या माणसासाठी कुठलाही निसर्गाजवळ जाणारा प्रवास म्हणजे अप्रुपच! यातही जे "भटके" म्हणून जन्माला येतात, त्यांना लागलेलं व्यसन म्हणजे प्रवास! मी अनेक प्रांतात थोडे थोडे दिवस जाऊन आले आहे.. सुरवात झाली ती उत्तराखंड पासून! हरिद्वार, हृषीकेश, बद्री-केदार... आणि तिथला सगळा परिसर म्हणजे स्वर्गच जणू! त्या प्रवासाने मला जागं केलं..  आपल्या देशाची नवी ओळख करुन दिली.. तिथल्या निसर्गाने मोहिनी घातली.. आणि या भारत भूमीच्या सौंदर्य

Butterfly.. एक तरल कथा!

Image
Fly like a butterfly, Sting like a bee!!  Butterfly ही मेघाच्या आयुष्याची कथा! खरंतर अशा अनेक मेघा आपल्या आसपास असतात..कधीकधी आपणच मेघा असतो.. कधी तिऱ्हाईत म्हणून तिला बघत असतो! पण तीच कथा 80 mm च्या स्क्रिन वर दिसू शकेल हे कळायला नजरच लागते! आणि वेलणकर भगिनींना ते करेक्ट जमलेलं आहे! एक साधी सोपी कथा घेऊन त्या भोवती मोजक्या पात्रांची गुंफण करुन सरळ सोप्या पद्धतीने केलेली कथेची मांडणी मनाला भिडून जाते.. एक दोन ठिकाणी गोष्टी खूप predictable, किंचित अति रंजित आणि सिरीयल type वाटतात. एक दोन scenes मधे अरे असं कसं झालं असंही वाटून जातं, पण कदाचित ती माध्यमाची गरज असू शकते. संगीत सुद्धा छान हलकं फुलकं झालं आहे..विशेषतः शेवटच्या sequence मधली कविता मनात रुंजी घालते.. पटकथा आणि संवाद सुंदर जमले आहेत. उगाच गृहिणीचं दुःख मांडणारं स्वगत वगैरे कुठेही येत नाही..या उलट लहान लहान पण अतिशय आशयघन संवाद उत्तम गुंफले आहेत जे तुम्हाला विचार करायला लावतात. काही ठिकाणी खूप shake होणारा कॅमेरा मात्र त्रासदायक वाटतो..त्यामागचं कारण लक्षात आलं नाही..ट्रेलर मधे दिसलेल्या बऱ्याच गोष्टी चित्रपटात मात्

मिलेनियल म्हणून जगताना! (Food Culture - Part 1)

Image
मिलेनियल म्हणून जगताना! Part 1 - Food Culture! People born in 1981- 1996 are the best generation ever! मीलेनियल पिढी ही या दोन सहस्त्र वर्षांमधील दुवा समजली जाते. ज्यांनी सरलेल्या काळातील जीवनशैली काही प्रमाणात अनुभवली, आणि त्याचा पाया घेऊन ते नव्या बदलांना सामोरे जात, internet सारख्या revolutionary बदलाला सामावून घेत उभे राहिले! पण आता या आमच्या मिलेनियल पिढीने इतकं वेगाने बदलणारं जग बघितलंय की या पुढे आलेली प्रत्येक पिढी ही ८० च्या पुढच्याच स्पीड ला धावणार आहे, नव्हे नव्हे, ती येताना याच वेगाने येणार आहे! त्याचा प्रत्यय अलीकडे पदोपदी येत असतो. तसाच काही महिन्यांपूर्वी आला आणि म्हणून हा लेखनप्रपंच! एका रविवारी सकाळी मी मॉर्निंग वॉकला जाऊ म्हणून निघाले असताना आई सहज म्हणाली की आज मणिजचा इडली - वडा आणतेस का नाश्त्याला? पडत्या फळाची आज्ञा घेऊन रवाना झाले! (मणिज म्हणजे माटुंग्याचं. आम्ही रहातो कुर्ल्याला. पण उत्साह बघा!) त्याचं काय आहे, हिंदू कॉलनी आणि माटुंग्याच्या त्या भागाशी माझं अनेक जन्मांचं नातं आहे (असं मी समजते). आणि या जन्मातील ती कर्मभूमी आहे असं म्हटलं तर

Happy 60th Birthday Wonder Woman!

Image
आपल्या आयुष्यात सगळ्यात पहिली wonder woman येते ती म्हणजे आपली आई! आणि आज माझ्या wonder womanचा ६०वा वाढदिवस! खरं सांगू तर असं वाटतंच नाहीये..कारण आजही तिचा कामाचा उत्साह, चेहऱ्यावरचा टवटवितपणा आणि आम्हाला लाजवेल अशी जिद्द हे सगळं अवाक करणारं आहे! बेताच्या परिस्थितीत बर्व्यांच्या घरात झालेला जन्म..नंतर नारायणगावात ती वाढली जिथे आजोबा शेती सांभाळायचे. मूळ गावापासून लांब त्यामुळे सकाळी येणाऱ्या दुधाच्या गाडीबरोबर शाळेत जायचं..ती चुकली तर एवढ्या लांब चालत जायचं असा खडतर प्रवास! खरंतर व्हायचं होतं डॉक्टर, पण योग्य मार्गदर्शन नाही व त्यामुळे लागतील इतके मार्क मिळाले नाहीत आणि त्यातही ओपन कॅटेगरी आणि मध्यमवर्ग म्हणजे तर जवळजवळ अशक्यच.. पण म्हणून जिद्द न हरता तिने नर्सिंग हा विषय घेऊन पुण्यात शिक्षण घेतलं..पुढे नर्स म्हणून अतिशय तन्मयतेने, सेवाभावी वृत्तीने अनेक वर्षे तिने काम केलं..पुण्यातून मुंबईत आली, नातेवाईकांकडे राहून काम केलं.. दरम्यान लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा स्वतःच्या पायावर उभी असून, शासकीय नोकरी असूनही केवळ शिफ्ट ड्युटी असते आणि नर्स आहे म्हणून अनेकांनी न